सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जात असल्याने बहुतांशी रक्तदान शिबिरांमध्ये तरुण तसेच नागरिक रक्तदान करीत असतात.मात्र नेरे ता. भोर येथे द आर्ट ऑफ लिविंग यांच्या माध्यमातून परमपूज्य सद्गुरु रविशंकर यांच्या महाराष्ट्रात होणाऱ्या आगमनानिमित्त साधना ,गुरुपूजा व रक्तदान करा झाडे मिळवा हा उपक्रम राबविण्यात आला होता.या उपक्रमात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदात्यांना अन्य शेकडो उपस्थितांनाऔषधी वनस्पती लक्ष्मी तरु वृक्ष वाटप करण्यात आले. शिबिरावेळी औषधी वृक्ष वाटप केल्याने नागरिकांनी वृक्ष घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी ऋषी देववृतजी, जयंत भोळे ,रेश्मा परब, सरपंच उज्वला बढे, उपसरपंच राजू चिकणे, आकाश सावले, सुरज सावले, सागर बढे, बापू सावले ,गणेश उभे ,महेश उभे,अक्षय पवार, रमल सावले ,वैशाली मरगजे, साधना शिंदे,रेश्मा म्हस्के आदींसह शेकडो तरुण,तरुणी उपस्थित होते.