सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
रस्त्यांवरील वाढते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शासनाच्या वतीने सर्वत्र जनजागृती केली जात असून अभियानात भोर तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन स्वयंशिस्तीचे पालन करून वाहतूक नियम पाळावेत असे आवाहन भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी केले.
भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी पोलीस हवालदार विजयकुमार नवले, सुनील चव्हाण, दत्तात्रय खेंगरे ,शिक्षक रामदास तोडकर ,संजय कडू विष्णू अवघडे उपस्थित होते.दबडे पुढे म्हणाले शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती विद्यार्थीदशेतच समजली पाहिजे. शाळा महाविद्यालयांमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाईल.यातून वाहतुकीचे नियम व दंडात्मक कारवाई या संदर्भात जनजागृती होऊन भविष्यातील अपघात निश्चितच टाळतील.