सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचा शारीरिक ,मानसिक भावनिक ,अशा सर्व दृष्टीने विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये वर्षभरात अनेक उपक्रम आणि कार्यक्रम साजरे केले जातात. या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता कार्यक्रम असतो तो म्हणजे स्नेहसंमेलन सोहळा कारण मुलांना येथे त्यांच्या आवडीचे नृत्य प्रकार साजरी करण्याची संधी मिळते. आणि याच दृष्टिकोनातून एस .डी सह्याद्री पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज चा सतरावा स्नेहसंमेलन सोहळा समता पॅलेस (फरांदे नगर )या ठिकाणी अगदी जल्लोषात आणि उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून अंकुश सावंत ( प्रेसिडेंट ऑफ साई सेवा प्रतिष्ठान वाघळवाडी) संपत गावडे (ब्लॉक एज्युकेशन,बारामती )दिलीप फरांदे (चेअरमन समता नागरी पतसंस्था )मु.सा .काकडे कॉलेजचे विद्यमान प्राचार्य देविदास वायदंडे अजिंक्य सावंत एस.डी सह्याद्री पब्लिक स्कूलचे अध्यक्ष, अजित वाघमारे (एस.डी सह्याद्री पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यमान प्राचार्य) अनुराधा खताळ (उपप्राचार्या एस. डी .सह्याद्री पब्लिक स्कूल) व बालकलाकार कार्तिक लोखंडे(डान्स महाराष्ट्र डान्स मधील स्पर्धक) आदी उपस्थित होते.
भव्य दिव्य असे समता पॅलेस आणि विद्यार्थ्यांनी केलेले एकापेक्षा एक असे सुंदर नृत्य प्रकार पाहून प्रेक्षकांचे तर डोळेच दिपले. नर्सरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले. कार्यक्रमातील सर्व नृत्य प्रकार कोरिओग्राफर योगेश ननवरे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बसवले होते. ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, कोरिओग्राफर योगेश ननवरे सर ,आणि ज्युनिअर कॉलेजचे सतीश कांबळे यांच्या नृत्याने तर प्रेक्षकांचे पाय गाण्याच्या तालावर थिरकू लागले. प्रतापगडच्या थीमने प्रेक्षकांच्या मनात शौर्याची भावना जागृत केली , लगान थीमने शेतकऱ्यांविषयी आदराची भावना निर्माण केली, सिंबा थीमने महाराष्ट्र पोलिसांविषयी कृतज्ञतेची व पराक्रमाची भावना निर्माण झाली,तर फॅमिली थीमने प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आले. असा बहुरंगी रंगतरंग स्नेहसंमेलन सोहळा अगदी जल्लोषात पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन एस.डी सह्याद्री पब्लिक स्कूल मधील सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अगदी उत्कृष्टपणे पार पाडले.