सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुवासाहेब मंदिरामध्ये नवीन वर्षाचे औचित्य साधून दोन दिवसांच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
निरेचे उपसरपंच व बुवासाहेब तरुण मंडळाचे अध्यक्ष राजेश काकडे यांच्या संकल्पनेतून दारू नको दूध प्या... या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३१ रोजी मंदिरामध्ये भजन कीर्तनाचे कार्यक्रम होऊन नवीन वर्षाच्या एक तारखेला बुवासाहेब महाराज पालखीची मिरवणूक संपूर्ण नीरा शहरांमध्ये काढून ग्रामप्रदक्षणीय करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कामी विशेष सहकार्य नीरा शहर सरपंच तेजश्री काकडे माजी उपसरपंच दीपक काकडे सदस्य अनंता शिंदे गणेश जावळे हनुमंत धुमाळ चंद्रकांत सूर्यवंशी मनोहर फरांदे इत्यादींचे लाभले असून मंडळातर्फे अनेक विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये रक्तदान शिबिर, शैक्षणिक आर्थिक मदत,वृक्षारोपण नीरा शहर स्वच्छता अभियान तसेच दरवर्षी श्रावण महिन्यात सुद्धा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते हे सर्व उपक्रम मंडळाचे अध्यक्ष राजेश काकडे उपसरपंच निरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जातात.