सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील महाड -पंढरपूर राज्य मार्गावरील आपटी ते निगुडघर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळेना झाले आहे असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे यामुळे दुचाकी,चार चाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महाड -पंढरपूर राज्य मार्गावरील भोर -वरंधा घाट मार्गे महाडला जोडणारा वाहतुकीसाठी जवळचा रस्ता आहे.या रस्त्यावरून नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते.मात्र आपटी ते निगुडघर ता.भोर पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर अर्धा फुटापर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत तर प्रवाशांचे कंबरडे मोडत आहे.यामुळे नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावेत या मागणीसाठी भोर तालुका शिवसेना पक्षातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले आहे.यावेळी भोर तालुका शिवसेना प्रमुख हनुमंत कंक , उपतालुकाप्रमुख बाळासाहेब वाटकर , युवा शिवसैनिक समीर घोडेकर ,संतोष शिवतरे , मयुर म्हस्के आदी उपस्थित होते.यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर खड्डे बुजवून नागरिकांना वाहतुकीसाठी उत्तम रस्त लवकरच उपलब्ध केला जाईल असे आश्वासित केले.
----------------
अपघातांमध्ये वाढ
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना अडचणी येत आहेत.तर वाहन चालवताना रस्त्यातील खड्ड्यांमध्ये गाडी आपटून अपघात होत असल्याने अपघातांमध्ये वाढ झालेली आहे.दरम्यान आपटी निघूडघर रस्त्यावरील खड्डे कोणी भरेल का असा प्रश्न वाहन चालकांकडून उपस्थित होत आहेत.