पुरंदर बिग ब्रेकींग ! बॉयलरमधील लोखंडाचा गोळा बाहेर उडाला......! घर चालवण्यासाठी रोज पायपीट करणाऱ्या राखच्या 'रोहित'चा जीवच गेला...! जेजुरी एमआयडीसी मधील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 जेजुरी : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी एमआयडीसी मधिल बर्जर पेंट कंपनीत काल ( शनिवारी ) रात्री अपघात झाला असुन एका युवकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.तर  काही तरुण जखमी झाले आहेत .
         जेजुरी एम.आय.डी.सी मधील बर्जर् पेंटस् या रंग बनवण्याच्या कंपनीतील बॉयलर मध्ये पावडर गुळगुळीत करण्यासाठी लोखंडाचे गोळे फिरवले जातात त्यातील गोळा बाहेर उडाल्याने हा अपघात झाला आहे.यामध्ये कंपनीतील भिंतही पडली आहे. या अपघातात  पुरंदर तालुक्यातील राख येथील रोहित जयवंतराव माने या २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. रोहितच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो जेजुरी एमआयडीसी येथील गेले अनेक वर्षे झालं काम करत होता. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली नाही मात्र या घटनेला जेजुरी पोलिसांनी  दुजोरा दिला आहे.
To Top