Bhor Big Breaking ! बंधाऱ्यात पडून वृद्धाचा मृत्यू : भोर तालुक्यातील खानापूर येथील घटना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-मांढरदेवी मार्गावरील खानापूर ता.भोर येथे गावात जाणाऱ्या रस्त्याशेजातील बंधाऱ्यात तोल जाऊन पडून तायाप्पा शंकर गायकवाड वय-८२ रा.खानापूर या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.३० रात्री आठच्या दरम्यान घडली.
      खानापूर ता.भोर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी छोटे पाटबंधारे विभागाचा बंधारा बांधण्यात आलेला आहे.या पाणी तुंबवलेल्या बंधाऱ्या शेजारून गावात ये-जा करण्यासाठी गेलेल्या रस्त्याच्या  पुलावरून गायकवाड घरी जात असताना पुलाला कठडे (रिलिंग) नसल्याने तोल जाऊन पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.घटनास्थळी भोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उद्धव गायकवाड,हवालदार शिंदे तसेच पोलीस पाटील राधिका रवळेकर,सरपंच मंगल गायकवाड,जयवंत थोपटे,गणेश थोपटे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
                
पुलाला कठडे असते तर जीव वाचला असता
    खानापूर गावात ये- जा करण्यासाठी छोटे पाटबंधारे च्या शेजारून रस्ता गेलेला आहे. या रस्त्याच्या फुलावरून गावात मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरू असते तसेच लहान मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी याच फुलाचा वापर करावा लागतो. मात्र या फुलाला अनेक वर्षांपासून कठडेच नसल्याने हा अपघात घडला आहे.पूलाला कठडे असते तर तायाप्पा गायकवाड बंदरात पडले नसते परिणामी त्यांचा जीव वाचला असता असे खानापूर येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
To Top