सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला अपघात झाला आहे.
यात तीन मुली गंभीर तर चोवीस मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. शिर्डी वरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करत असताना ही घटना घडली आहे.
सागर क्लासेस, इचलकरंजी येथील 8 वी ते 10 वी क्लास चे मुलींची सहल औरंगाबाद शिर्डी अशी आयोजित केली होती शिर्डी येथून परत इचलकरंजी येथे जाताना यशोदा ट्रॅव्हल्स ची बस बारामती पुढे पाहुणेवाडी गावच्या हद्दीत बस पुलावरून खाली गेल्यामुळे 24 मुली किरकोळ व 3 मुली गंभीर जखमी आहेत एकूण 48 मुली व 5 स्टाफ मेंबेर होते. जखमी ना पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.