बारामती ! सोमेश्वरनगरला आजी माजी सैनिक संघटनेद्वारे आदर्श सरपंचासह गुणवंताचा सत्कार करीत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर ( प्रतिनिधी)
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ मुख्य शाखा सोमेश्वरनगर  व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी द्वारे आज ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करणेत आला .
           सोमेश्वर कारखाना माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे व जेष्ठ माजी सैनिक गणपत गाडेकर यांचे हस्ते  ध्वजारोहण करणेत आले . यावेळी सोमेश्वर कारखाना संचालक व उद्योजक संग्राम सोरटे , प्रदीप धापटे, करंजेपुल चे आदर्श सरपंच वैभव गायकवाड, मा. सरपंच आप्पासाहेब गायकवाड, डॉक्टर आनंद सोनवणे राष्ट्रीय धावपटू अंकुश दोडमीसे ,साई सेवा हॉस्पिटल चे डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. राहुल शिंगटे, वीरनारी  सूळ मॅडम, तसेच  बबन महागडे, अध्यक्ष बाळासाहेब शेडंकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड , उपाध्यक्ष भगवान माळशिकारे, रामदास कारंडे, राजाराम शेंडकर, नितीन शेंडकर, गणेश शेंडकर, स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष भाऊ लकडे, दत्तात्रय चोरघे ऑन ड्युटी सुभेदार कांबळे साहेब, ऑन ड्युटी सुभेदार तानाजी भंडलकर, महेश पाठक , मोहन शेंडकर, बबन ठोपरे, भारत मदने, प्रकाश ठोंबरे  ई मान्यवर हजर होते .
     दरवर्षी या राष्ट्रीय सणानिमित्त परिसरातील गुणवंताचा सत्कार करणेत येतो यावर्षी राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार मिळाल्याबद्दल बायडाबाई खंडु लकडे , आदर्श गाव घरकुल योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवुन गावाचे नाव राज्यात चमकवणारे सरपंच वैभव गायकवाड याना आदर्श सरपंच म्हणुन ,अजयश्री पतसंस्था सह अंबामाता दुध उत्पादक संस्था यशस्वी पणे चालवणारे  राजवर्धन शिंदे यांना आदर्श संस्थाचालक  म्हणुन , करंजेतील सैनिक पोपट हुंबरे यांचा मुलगा अभिनय हा  वकिलीच्या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण झालेबद्दल , पुणे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल  वैष्णवी नितीन शेंडकर,पत्रकार संतोष शेंडकर, दत्ता माळशिकारे, महेश जगताप, युवराज खोमणे यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ देवुन  गौरवण्यात  आले. 
       सूत्रसंचालन सचीव रामदास कारंडे व  आभार भगवान माळशिकारे यानी मानले .यावेळी  राजवर्धन शिंदे ,वैभव गायकवाड यानी आजी माजी सैनिक संघटनेचे कार्याचे कौतुक करीत  संस्थापक जगन्नाथ लकडे ,गणेश आळंदीकर ,बाळासाहेब शेंडकर ,भगवान माळशिकारे यानी त्यांच्या टीम च्या माध्यमातून तालुक्यात नव्हे तर राज्यात  एक आदर्श संघटना तयार केली आहे .कोव्हीड काळात व त्यानंतरही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शेकडो तंटे कोर्टात न जाता मिटवले असल्याचे सांगुन  कार्याचा गौरव केला.
            साई सेवा मल्टिसिटी हॉस्पिटल वाघळवाडी यांच्यातर्फे सर्व आजी माजी सैनिक व सैनिक परिवार यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिवसभर करणेत आले .
To Top