सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : कल्याणी जगताप
किरण गाजरे यांनी दिग्दर्शित केलेली quick prime 24 मराठी प्रस्तुत प्रतिक कुमार एम शाह निर्मिती कार्यकारी निर्माता मनोज विभुते. धनगरवाडा (एक फौजी )ही सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली धनगर समाजावर भाष्य करणारी ती पहिलीच वेब सिरीज आहे. यामध्ये धनगर समाजाचे जनजीवन त्यांचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याची कथा किरण गाजरे लेखन विष्णू पाटील ने केले आहे तसेच या वेब सिरीजच्या माध्यमातून किरण गाजरे यांनी नवोदित कलाकारांना संधी दिली आहे . धनगरवाडा या वेब सिरीज च शूटिंग माळेगाव फलटण वडगाव बारामती आसपासच्या गावात होत असून आनंदाचे वातावरण आहे.. रसिक प्रेक्षकांना पण पहावयास मिळत आहे. quick prime 24 मराठी या you tube चॅनेल वर शनिवारी सकाळी 09:00 वाजता पहायला मिळते .यामध्ये संकेत जाधव प्रणाली सूर्यवंशी ,विष्णू पाटील ,जगन खांडेकर, पूर्वा मोहिते विलास गवळी ,रोहित नगरे, नवनाथ काळे ,पल्लवी प्रगती मोहोड, मोनाली मोहोटकर, संजय जाधव जयदीप पारधे ,अजर शेख निखिल शहा ,स्वप्निल राऊत, प्रिती राऊत , हेमंत जाधव दिपक जाधव असे ग्रामीण भागातील कलाकारांनी यात काम केले आहे..
किरण गाजरे यांनी आजपर्यंत सुंदरी ,शेवटचं पान रोमी रिक्षावाला, तुरा , वेब् सिरीज केल्या असून आता premwari productuon वर नाद एकच बैलगाडा शर्यत हि वेब सिरीज चालू आहे..आत्ता पर्यंत अनेक कलाकार घडून गेले आहेत् काही मालिका चित्रपट मध्ये आपली कामगिरी दाखवत आहेत..
mx playar ott बालमित्र चित्रपट आहे .बारामती मधून जाणारा पहिला चित्रपट होता.. त्यांचा आता नवीन चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे..
बारामती आसपासच्या च्या नवोदित कलाकारांना संधी किरण गाजरे हे देत असतात.