......आणि पवार साहेबांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेला फोटो ..वाणेवाडीच्या चिमुकलीला व्हाट्सअप वर पाठवून दिला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार हे कुठलीही गोष्ट कधी विसरत नाहीत. हे सर्वांना ठाऊक आहे. याचाच प्रत्यय आज वाणेवाडीकरांना आला आहे. 
          दोन दिवसापूर्वी खा. शरद पवार हे आपल्या गाडीतून सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या समवेत बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील जुने मित्र रघुनाथ भोसले यांच्या निवास्थानी भेटीसाठी जात असताना वाणेवाडी गावात एक शाळकरी मुलगी शरद पवार यांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी रस्त्यावर उभी असते. पवार साहेब देखील त्या मुलीजवळ आपल्या गाडीचा ताफा थांबवतात. मात्र वडिलांचा मोबाईल घेऊन आलेल्या त्या मुलीला मोबाइल चा पासवर्ड निघाला नाही. बराच वेळ गेल्यावर साहेब स्वतःचा मोबाईल सुरक्षारक्षकाकडे देऊन फोटो घेण्यास सांगतात व हा फोटो मी त्याच्या वाडीलांच्या मोबाईलवर पाठवून देईल असे सांगतात. 
              शरद पवार यांच्या घाईच्या कामातून त्या चुमुकलीला फोटो पाठवला आहे. तृप्ति तुषार भोसले इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीने पवार साहेबांचे आभार मानले आहेत. पवार साहेबांच्या मोबाईल वरून 
हा फोटो वाणेवाडी येथील शंभू जगताप (मळशी) यांच्या मोबाइल पाठवला. वाणेवाडी चौकातील प्रवीण कोंडे यांनी ही मुलगी तुषार भोसले यांची मुलगी तृप्ती असल्याचे ओळखले. शंभू जगताप यांना सांगण्यात आले. हा फोटो तृप्तीचे वडील वडील तुषार भोसले यांना पाठवून त्यांना फोटो पोहचल्याचा स्क्रीन शॉट पाठवा.साहेबांच्या या प्रेमापोटी तुषार भोसले यांनी त्याचे आभार मानले आहेत.
To Top