इंदापूर ! पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या : बावडा येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बावडा : प्रतिनिधी
अनैतिक संबंधातून पत्नीने व त्याच्या प्रियकराने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. याबाबत पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.  
       याबाबत मुस्तफा जिलानी मुलानी वय ३८ वर्ष राहणार बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी  प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत व काजल जावेद मुलानी दोन्ही राहणार बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद जीलानी मुलानी वय ३२ वर्ष रा बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 
                                                                            याबाबत सविस्तर हकीकत अशी, दि 21/01/2023 रोजी सकाळी 10/00 वां चे सुमारास फिर्यादी दुकानात असताना प्रवीण उर्फ बाबा तानाजी सावंत हा माझ्या भावाच्या घरी येऊन माझ्या भावास दमदाटी करून तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून निघून गेला त्यामुळे माझ्या भावाने प्रवीण बाबाजी तानाजी सावंत  व काजल जावेद मुलांनी यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरामध्ये दोरीच्या साह्याने पत्राच्या लोखंडी चॅनलला बांधून फाशी घेऊन मयत  झाला आहे तरी माझ्या भावाला अनैतिक संबंधातून प्रवीण उर्फ बाबत तानाजी सावंत व भावजय काजल जावेद मुलांनी यांनी आत्महत्यास प्रवृत्त केल्याने त्याने त्याचे जीवन संपवले आहे.तरी प्रविण उर्फ बाबा तानाजी सावंत भाऊजय काजल जावेद मुलांनी दोन्ही राहणार बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे
To Top