सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे आणि बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांच्यात चुरशीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर पोलिसांनी पत्रकार संघाचा ३५ धावांनी पराभव केला

वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे आणि बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांच्यात दरवर्षी क्रिकेट सामन्याचे आयोजन केले जाते. नव्या वर्षाच्या सुरवातीला पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या पुढाकाराने सामना पार पडला. पोलिस उपविभागीय अधिकारी बापू बांगर, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, अण्णासाहेब घोलप, गजानन गजभारे यांच्या कालावधीत झालेली परंपरा नवे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यानिमत्ताने पुढे सुरू ठेवली.
रविवारी सकाळी काकडे महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर कप्तान महेश जगताप व कप्तान सोमनाथ लांडे यांच्यात पत्रकारांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. सामन्यात सुरवातीला पोलिस संघाने जोरदार बॅटींग करत १०० धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये पोलिस फौजदार सलिम शेख, खेळाडू तुषार जैनक यांच्या बॅटमधून धावांचा पूर वाहिला. या धावांचा पाठलाग करताना पत्रकार संघाचे सचिन वाघ, अमर वाघ, सुनिल जाधव, हेमंत गडकरी यांनी जोरदार बॅटींग करत प्रयत्न केले. मात्र ६५ धावांपर्यंत डाव सिमीत राहिला फौजदार योगेश शेलार यांनी उत्कृष्ट यष्टीरक्षण केले. सलिम शेख सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. पोलिस संघाला उद्योजक दीपक साखरे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, अॅड. नवनाथ भोसले यांच्या हस्ते विजयी चषक देण्यात आला. याप्रसंगी अॅड. गणेश आळंदीकर, महेश जगताप, युवराज खोमणे, सोमनाथ लोणकर, सागर चौधरी, रूपेश साळुंके, अमोल भोसले, एम. एन. साळुंके, दीपक वारूळे उपस्थित होते.
यानिमित्ताने दहशतवादी विरोधी पथकामध्ये निवड झाल्याबद्दल सोमनाथ लांडे यांचा तर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सचिन काळे यांचा सत्कार करण्यात आला.
---