सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मेढा - जावली तालुक्यासाठी शेती परिषद घेवुन येथिल शेतकर्यांना पाणी उचलण्यासाठी आणि योग्य पीक घेण्यासाठी मार्गदर्शन व्हावे. पाणी आमच्या कडे असुन शेतकरी पाणी उचलत नाही. त्यांना त्यांना बॅकेच्या मार्फत सहकार्य करा. पर्याटणाला चालना देत असताना आमच पाणी आम्हाला मिळलच पाहीजे असा ईतिहास घडवु आणि हिच खरी आण्णांना श्रद्धांजली होईल असा विश्वास देत आण्णा आमदार होण्या मागे सर्वसामान्य जनतेची नाळ जोडली गेली होती असे विधानपरिषदेचे आ. शशिकांत शिंदे यानी सांगीतले.
मेढा येथिल नक्षत्र मंगल कार्यालयात स्व. आ. जी. जी. कदम आण्णा यांच्या २६ व्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी माजी आ. सदाशिव सपकाळ, जिल्हा बॅकेचे चेअरमन नितिन काका पाटील, जावली बॅकेचे चेअरमन विक्रम भिलारे, श्रीधरजी सांळुखे, आ. जी. जी. कदम प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा श्रीमती आशालता कदम, माजी अर्थ व शिक्षण सभापती अमितदादा कदम, एकनाथ ओंबळे, जावली बॅकेचे कोअर कमिटी अध्यक्ष विश्वनाथ धनावडे, शिवसेना तालुका अध्यक्ष शांताराम कदम, विश्वनाथ धनावडे, जा. बॅ. व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी , आनंदराव जुनघरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाले पाणी उशाला आहे पण जानेवारीत पाणी खाली गेल. राजकीय जोडे बाहेर ठेवा. कोणी कोठेही असा पण बोंडारवाडी धरणावर ठाम रहा असे आवाहन करून ते पुढे म्हणाले अणूशेषाच कारण अधिकारी सांगतात पण विदर्भ मराठवाड्या पेक्षा जावलीची परिस्थिती भयावह आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव माण मध्ये वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे तालुक्याच्या विभागवार अनुशेष असावा असे सांगत सरकार कायदे बनवित असते सरकारला कायदे बनविण्यासाठी आपली ताकद असली पाहीजे असे आ. शिंदे यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले अमितने प्रतिष्ठाणच्यावतीने शेतकऱ्यांचा सन्मान केला मला कौतुक आहे. शेतकऱ्यांनी हरबरा, सोयाबीन, भात आदी पिकांमध्ये राज्यात नंबर मिळविले परंतु उस कोण करीत नव्हते कारण उस केला तर तो नेणार कोण ? आम्हाला वाटल होत प्रतापगड सुरु होईल पण तो झाला नाही परंतु भुईंजचा कारखाना सुरु झाल्याने आम्हाला अपेक्षा आहे असे ही आ. शिंदे यांनी सांगितले.
माणस स्वतःच्या कृतुत्वाने मोठी असताना पक्षाची साथ, नेत्याची साथ असुन जनतेची साथ लागते आणि कोयनेच्या खोऱ्यातील जी जी आण्णा यांची नाळ ही सर्वसामान्य माणसाशी होती म्हणून ते आमदार झाले असे आ. शशिकांत शिंदे यांनी जावलीतुन काही अपवाद वगळता सर्व आमदार विधानसभेत गेले. कुणाला असे वाटले होते जावलीचे मुख्यमंत्री होतील. माणसाला संधी मिळाली की तो नेतृत्व दाखवु शकतो परंतु त्याला संधी देण्याच काम आपण सगळ्यांनी केल पाहीजे. जी.जी. आण्णा दोन वेळा आमदार झाले याचा दाखला देत अमित दादांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना संधी देण्याच आवाहन न कळत आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
माजी आ. सदाशिव सपकाळ म्हणाले २६ वर्षे होवुन ही अण्णांच्या वर प्रेम करणारा वर्ग या कार्यक्रमाच्या उपस्थितां वरून दिसुन येतो. कोयना कन्हेर धरणे झाली. पूर्नवसनाचा कायदा नसताना प्रतिकुल परिस्थितीत अण्णांनी शेतकर्यांना न्याय देण्याचे काम केले त्याची पोहच पावती म्हणून आण्णांना विधान सभेत जाता आले असे सांगुन आम्ही समोरा समोर निवडणूका लढवुन पण एकत्र बसुन विकासाचे राजकारण करीत होतो परंतु आताचे राजकारण हे बालीशपणाने आहे तर पुर्वीचे राजकारण हे पोक्तपणाचे होते असेही सपकाळ यांनी सांगीतले.
ते पूढे म्हणाले मी निवडून आल्यानंतर दोन वर्षांनी आण्णा गेले परंतु ते जिवंत असते तर मी ९९ ला पुन्हा निवडून आलो असतो इतके आमचे निखळ व प्रेमळ संबध निर्माण झालेले होते असे सांगुन आण्णांच्या पावलावर पाऊल ठेवुन अमित दादांचे काम सुरु आहे त्यांना आपण सर्वजण ताकद देवु असे आवाहन उपस्थितांना माजी आ. सदाशिव सपकाळ यांनी केले.
दरम्यान ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सदस्य, पुस्कार प्राप्त शेतकरी तसेच विविध नियुक्त्या झालेल्यांचे सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. श्रीधरजी साळुंखे यांनी व्याख्यानातुन आण्णांच्या कार्याचा उजाळा दिला.
अमित कदम यांनी प्रास्ताविकातून आण्णांच्या प्रेरणेचा वारसा लाभला असल्याचे सांगुन प्रतिष्ठाणाच्या माध्यमातुन कोरोना काळात जनेतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगुन जनतेच्या हाकेला आम्ही कदम कुटुंबीय सदैव तत्पर असल्याचे वचन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
उपस्थित मान्यवरांनी स्व.आ. जी. जी. आण्णांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन आदरांजली वाहिली. यावेळी सर्व ठिकाणावरून पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पार्टे यांनी तर आभार नारायण शिंगटे यांनी केले.