सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
शालेय जीवनात शिक्षणाचे धडे घेत असताना विद्यार्थ्यांकडे विविध प्रकारचे कला गुण अवगत असतात.मात्र विद्यार्थ्यांच्या त्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यालयात होणारे वार्षिक स्नेहसंमेलन महत्त्वाचे ठरते.या कलागुणांच्या सादरीकरणातून विद्यार्थी भविष्यातील सुजन नागरिक घडन्यास मदत होत असते असे मत राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खानापूर ता.भोर येथे शुक्रवार दि.२० वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी थोपटे बोलत होत्या.स्वरूपा थोपटे तसेच मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात झालेल्या क्रीडा, निबंध,वक्तृत्व स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त पंढरीनाथ भिलारे, गोविंद थोपटे, प्रा.तात्याराव जेटीथोर,माजी प.स.सदस्य सुवर्णा मळेकर,राजगड संचालक उत्तम थोपटे, सरपंच मंगल गायकवाड,उपसरपंच वैशाली पवार, सदस्य रेशमा थोपटे,आशा थोपटे,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव थोपटे,आनंदा आंबवले,संतोष केळकर,प्राचार्य रमेश बुदगुडे,विकास शिंदे ,प्रा.चंद्रकांत नांगरे,माजी उपसरपंच राजू धोत्रे,श्याम जेधे आदींसह ग्रामस्थ,पालक तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोपटे पुढे म्हणाल्या विद्यार्थी सर्व गुण संपन्न होण्यासाठी शालेय जीवन महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी भविष्यकाळ घडविण्यासाठी कलागुणांच्या माध्यमातून पुढे यावे.