खंडाळा ! लोणंद नगरपंचायतने वीजबिल थकवल्याने...अंधाराचा फायदा घेत त्यांनी मारला होता तब्बल २१ तोळ्यांवर डल्ला : लोणंद पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रशांत ढावरे
सुमारे दिड वर्षापुर्वी दिनांक ५ जुलै २०२१ रोजी लोणंद शहरातील पथदिवे वीजबिल थकल्यामुळे बंद असतानाच्या काळात लोणंद बाजारतळावरील कुसूम अशोक शेलार यांच्या घरातून अंधाराचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरल्याची फिर्याद अज्ञात चोरट्याविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात दाखल होती. या गुन्ह्य़ाचा यशस्वी तपास करत लोणंद पोलीसांनी सुमारे साडेसात लाखांचा चोरीचा ऐवज हस्तगत करत चोरटा आणि दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्यांना अटक करण्यात यश संपादन केले.
        सदर गुन्हयाचा तपास चालू असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सपोनि विशाल वायकर , गुन्हे प्रकटीकर विभाग लोणंद यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन चोरी करणारा महेश किरण चव्हाण वय २७ वर्षे रा. जामदारमळा ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर तसेच चोरीस गेलेला माल विकत घेणारे सोनार मंदार चंद्रकांत पारखी वय ४१ वर्षे रा. शुक्रवार पेठ सातारा ता. सातारा जि.सातारा, शाहरुख गुलामुर्तजा शेख वय - ३० वर्षे रा. शनिवार पेठ सातारा ता. सातारा जि.सातारा, श्रीधर प्रकाश माने वय ३३ वर्षे रा. राधिका रोड सातारा ता.सातारा. जि. सातारा यांचा सदर गुन्ह्यातील असणार सहभाग निष्पन्न करुन त्यांचे कडुन चोरील गेलेल्या दागिन्यापैकी   ७,५६०००/-रुपये किंमतीचे सुमारे २१ तोळे सोने हस्तगत केले.
         सदरच्या गंभीर गुन्याचा तपास पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल वायकर, अंगुलीमुद्रा विभाग साताराचे सपोनि श्री विजय जाधव, पो. उनि गणेश माने, मपो.उनि स्वाती पवार, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, अविनाश नलवडे श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, फैय्याज शेख, विठ्ठल काळे, अवधुत धुमाळ, अभिजीत घनवट, मोहन नाचन व राजु कुंभार यांनी भाग घेत यशस्वी तपास केला .
To Top