मागील दूध भेसळ प्रकरणात शिक्षा भोगून पण समीर मेहता सुधारालाच नाही...! सोलापूर, सातारा जिल्ह्यात पसरवले होते त्याने आपले जाळे...! पंढरपूर पोलिसांकडून वडगाव मधून एकाला अटक

Admin
3 minute read
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील दूध भेसळ प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. त्यावेळी वडगाव निंबाळकर येथील समीर मेहातासह अनेक मासे गळाला लागले होते. याप्रकरणात प्रमुख असलेल्या समीर मेहताला शिक्षा भोगावी लागली होती. 
            मात्र शिक्षा भोगून आलेल्या समीर मेहताने आपले कारनामे चालूच ठेवले होते. त्याने काही दिवस हा व्यवसाय बंद ठेवून नव्याने सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात दूध भेसळीचे जाळे पसरवले होते. बारामती तालुक्यातुनच तो आपला गोरखधंदा जोमाने चालवत होता. दुधामध्ये मिसळायचे रासायनिक द्रावण तो वडगाव निंबाळकर मधून बनवून देत असल्याची माहिती उघड झाली आहे. 
              दूध भेसळ प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील समीर सभाष मेहता यांच्या घरावर पोलिस आणि अन्नभेसळ प्रतिबंधक (एफडीए) खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त छापा टाकला. 
यामध्ये दूध भेसळीचे साहित्य आणि मशीन शील करण्यात आली आहे अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात दूध भेसळ प्रकरणात समीर मेहता दूध भेसळीचे द्रावण विकणारा प्रमुख वितरक असल्याची माहिती तपासात पुढे आल्यामुळे वडगाव निंबाळकर येथील राहत्या घरावर छापा मारला यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे मेहता याला विक्रीसाठी मदत करणारा साथीदार स्वप्निल राजेंद्र गायकवाड (रा. वडगाव निंबाळकर) याला पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. 
पंढरपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी  निलेश बाळासाहेब भोईटे ( वय 30 रा. रो हाऊस क्रमांक 38, वृंदावनम सोसायटी, टाकळी),  पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राचा मालक  परमेश्वर सिध्देश्वर काळे ( वय 40 )  आणि वाहनचालक गणेश हनुमंत गाडेकर (वय 25 रा. गणेश नर्सरी जवळ , टाकळी रोड, पंढरपूर)  तसेच वडगाव निंबाळकर येथील समीर सुभाष मेहता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवार (दि. १५) रोजी अन्न व अौषध प्रशासनाने ही कारवाई केली होती. त्यात दूधामध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे घातक द्रावण हे वडगावच्या समीर मेहता याच्याकडून नेले असल्याचे सांगण्यात आले होते. दूधात भेसळ करण्यासाठी आणलेल्या लिक्विडसह पोलिसांनी छोटा हत्ती ( एम एच सी यु 6628) वाहन आणि मानवी आरोग्यास अपायकारक ठरेल अशा द्रावणाचा सुमारे दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये किंमतीचा साठा पोलिसांनी जप्त केला होता.
स्वप्निल गायकवाड याला न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मेहता याच्याकडून आणखी कुठे कुठे हे घातक द्रावण भेसळीसाठी पुरवले जात होते, याची चौकशी गायकवाड याच्याकडे पोलिस करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून मेहता फरार झाला आहे. त्याचा लवकरच  शोध लागेल. प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 
 या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अद्याप मोठा तपास बाकी असल्याचे पंढरपूर ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले. 
--------------------------
To Top