सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांची बदली एटीएस पुणे ग्रामीण ला झाली असून त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन काळे हे वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकाचा कारभार पाहणार आहेत.
२०१९ पासून सोमनाथ लांडे हे वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकाचा कारभार पाहत होते. त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हाचा तपासांची उकल केली आहे. तर त्यांच्याच कार्यकाळात सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गौरवण्यात आले.
याव्यतिरिक्त महेश विधाते यांची बारामती पोलीस ठाणे वरून अप्पर पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, योगेश लंगुटे यांची बारामती पोलीस ठाणे वरून इंदापूर पोलीस ठाण्याला बदली करण्यात आली आहे.