भोर ! संतोष म्हस्के ! वेल्ह्याच्या २० वर्षीय युवतीचा नीरा नदीत मृतदेह आढळला : आत्महत्या की घातपात ?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
नीरा नदीमध्ये सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या युवतीची ओळख पटवण्यात पोलिसांना ७२ तासात यश आले असून नेहा शरद पिलाने वय - २० मूळ रा. वांगणी ता. वेल्हा जि. पुणे सध्या( रा. जयनाथ चौक धनकवडी पुणे) असे या मृत युवतीचे नाव आहे. संबंधित युवतीने आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत तपास शिरवळ पोलिसांकडून सुरू आहे.
     याबाबत मिळालेली माहिती अशी की शिंदेवाडी ता.खंडाळा येथील निरा नदीपात्रात रविवार दि. १५ मकरसंक्रात या दिवशी एका युवतीचा सडलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता.याबाबतची शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मित मयत नोंद झाली होती.संबंधित युवतीची ओळख पटविण्याकरिता पोलिसांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून माहिती मिळवली.पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलिस अंमलदार नितीन महांगरे, प्रशांत वाघमारे दीपक पालेवाड  यांच्या पथकाला तपासा दरम्यान संबंधित युवती ही पुणे शहरातील नेहा पिलाने असल्याची माहिती मिळाली.नेहा बेपत्ता असल्याची नोंद पुणे शहरातील सहकारनगर पोलीस स्टेशन येथे होती.
    शिरवळ पोलिसांनी नेहा हिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता मृतदेह नेहाचाच असल्याचे स्पष्ट तदनंतर नेहाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
To Top