सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील दीपक जगताप हे अंजीर उत्पादक शेतकरी खा. शरद पवार यांना बागेतील अंजीर भेट देण्यासाठी गेले असता साहेबांनी बघितल्या बघितल्या म्हणाले की मी बागेवरती आलो होतो त्याच बागेतील अंजीर आहेत का? हे हो साहेब त्याच बागेतील अंजीर आहेत.
असे पवार साहेबांना म्हणतात साहेबांनी विचारले रोज अंजीर किती निघतात मार्केटिंग कुठे करता रेट काय मिळतो? इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता का त्यावेळी पवार साहेबांना सांगितले पंधरा ते वीस जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांचे फोन येतात. जमेल तसं त्यांना मार्गदर्शन करतो काही शेतकरी कर्नाटक मधून सुद्धा फोन मेसेज करतात त्यांनाही मार्गदर्शन करतो तुम्ही बागेवरती आल्यापासून बरेच शेतकरी कनेक्ट झालेत. शेतकरी बागेवरती येतात का पाहायला हो साहेब बरेच शेतकरी बागेवरती येतात साहेबांना खूप आनंद झाला साहेबांना म्हटलं पठारावरती बागेत काम करताना वरून विमान जायचं विमानाकडे मान वर करून पाहायचं पण कधी आपण विमानात बसणार नाही. असं सतत वाटायचं पण मदुराईतल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने विमानाचे तिकीट पाठवून दिल अंजीर या पिकामुळे व साहेब तुमच्यामुळे साधारण शेतकऱ्याला विमानात बसू शकलो तिथे जाऊन त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले एक वेगळाच आनंद वाटतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला असे म्हटल्यावर साहेबांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटले व काही अडचण असल्यास सांगत जा म्हणत वडीलधाऱ्या नात्याने आधार दिला.