भोर ! भोरला बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार संघ भोर च्या वतीने दर्पणकार जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी लोकशाहीचा स्तंभ म्हणुन पत्रकारांकडे पाहीले जाते.बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण साप्ताहीक सुरू केल्याचा दिवस म्हणून आपण मराठी पत्रकारदिन साजरा करतो.पारदर्शक,भरवशाचे ,विश्वासार्ह लीखाण करून वाचकांसमोर वस्तूनिष्ट आणी वास्तव मांडावे असे आवाहन जेष्ट पत्रकार पुरूषोत्तम मुसळे यांनी केले.यावेळी पत्रकार बांधवांचा ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, खानापूरचे माजी उपसरपंच आप्पा गोळे तसेच बाजारवाडी येथील विकाचे माजी चेअरमन बाळासाहेब शिंदे यांनी शाल- श्रीफळ देऊन सन्मान केला.कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जाधव,संजय इंगुळकर ,दत्तात्रय बांदल,बाळू शिंदे,संतोष म्हस्के,रुपेश जाधव ,कुंदन झांजले,विक्रम शिंदे, ज्ञानेश्वर जेधे,जीवन सोनवणे, तुषार सणस ,दीपक पारठे उपस्थित होते.


To Top