सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थीत राहुन पत्रकाराना शुभेच्छा दिल्या.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त सोमेश्वरनगर च्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज पत्रकार दिन साजरा करणेत आला. प्रास्ताविक मधे पत्रकार संघाचे मा अध्यक्ष गणेश आळंदीकर यानी बदलत्या पत्रकारीतेबद्दल माहीती देत इंग्रजी राजवटीला हादरुन सोडणारी पत्रकारिता तत्कालीन वृत्तपत्रानी केली असे सांगीतले अवघे आठ वर्ष चाललेले दर्पण हे मराठी तील पहिले वृत्तपत्र होते इंग्रजांना कळावे म्हणुन त्यातील काही भाग ईंग्रजीतुन प्रकाशीत केला जात असे अशी माहीती त्यानी दिली . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले यावेळी त्यानी सर्व पत्रकाराना शुभेच्छा दिल्या.
पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मोरे, सोशल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यानी स्वागत केले. प्रास्ताविक गणेश आळंदीकर यांनी केले.यावेळी जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे ,संघाचे उपाध्यक्ष युवराज खोमणे ,मा अध्यक्ष गणेश आळंदीकर ,मा अध्यक्ष नवीद पठाण, संतोष शेंडकर,,मंगेश कचरे, सोमनाथ लोणकर आदी पत्रकार यावेळी हजर होते. सचीव चिंतामणी क्षीरसागर यानी आभार मानले .
कार्यक्रमाला सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर ,आनंदकुमार होळकर, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, सचीव भारत खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS