सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बी.जी. आता वय किती.... दादा जुना वाडा सोडून बंगल्यात केंव्हा आलात....आण्णा कामगार संघटनेचे काम अजून सुरू आहे का..खा. शरद पवार आपल्या जुन्या मित्रांना प्रश्न विचारतात..आणि शरद पवार यांचे जुने मित्र भारावून जातात.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे देशाचे मा. कृषिमंत्री शरद पवार आपल्या जुन्या मित्रांना भेटतात. आणि शरद पवारांच्या भेटीने मित्र भारावून जातात. १९६७ सालातील खा. पवार यांच्या खांद्याला खांदा देऊन साथ देणारे निंबुत चे बी जी काकडे, वानेवाडीचे रघुनाथ भोसले व तुकाराम जगताप यांची आज खा पवार यांनी आवर्जून भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली. बी जी आता वय किती आहे तुमचे यावर बि जी काकडे म्हणतात ८६ आहे. यावर खा पवार म्हणतात माझ्या पेक्षा ४ वर्षाने जास्त आहे. आता आपल्या वयाची किती शिल्लक आहेत या भागात यावर तर तीन असे उत्तर येते. सोमेश्वर कारखान्याचे मा संचालक रघुनाथ भोसले यांना खा. पवार म्हणतात.. दादा वाडा आवडून बंगल्यात केंव्हा आलात...तर तुकाराम जगताप यांना अजूनही कामगार संघटनेचे काम करता का असे खा. पवार आवर्जून विचारतात.
खा. पवार पुढे म्हणतात सोमेश्वर कारखाना चांगला चालला आहे. हे या भागात आले की समजते, लोकांचे राहणीमान बदलले आहे. सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत म्हणतात, साहेब आता वीज प्रकल्पाचे विस्तारीकरण करायचे आहे. कोजन आणि इथेनॉल मुळे ऊस दरात टनाला २०० रुपयांचा फायदा होत असल्याचे सांगत खा पवार पुढे म्हणतात मी असताना केलेला वीज करार आता संपत आला असेल. प्रकल्पांची गुंतवणूक बाहेर निघाली का नाही अजून सद्या कारखान्याचे गाळप किती होते. यावर सुनील भगत यांनी सविस्तर माहिती दिली. संचालक लक्ष्मण गोफणे म्हणतात ऊसतोड टोळ्या पैसे घेऊन ऊस तोडायला येत यावर पवार म्हणतात भविष्यात हार्वेस्टर शिवाय पर्याय नाही. सुनील भोसले म्हणतात, पण साहेब शेतकरी हार्वेस्टर घेऊ शकतात मात्र त्याचे अनुदान बंद झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ते पुन्हा चालू केले तर शेतकऱ्यांची मुले याकडे वळतील.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, संचालक राजवर्धन शिंदे, जितेंद्र निगडे, किशोर भोसले, सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, विक्रम भोसले, उत्तमराव भोसले, जयवंत भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.