सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वनविभागाच्या माध्यमातून वनसंरक्षण, सामाजिक जाणीव यातून सामान्यतील सामान्य व्यक्तीसाठी योगदान तसेच वनक्षेत्रामध्ये वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवून पर्यटकांसाठी उपयोगी कामातून योगदान देणारे भोर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय भागवत मिसाळ यांना भोर तालुका पत्रकार संघाकडून उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दत्तात्रय मिसाळ यांच्या कौतुकास्पद तसेच सामाजिक बांधिलकी व गौरवपूर्ण कार्याची दखल घेत पुरस्कार देण्यात आला.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती तसेच पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार संघाच्या कार्यक्रमात पुरस्कार प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी आदर्श माजी जि.प.सदस्य चंद्रकांत भाठे,कुलदीप कोंडे तसेच भोर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.