बारामती ! ढेकळवाडी येथे आशा महिला ग्रामसंघ कार्यालयचे उदघाटन व महिला बचतगट मेळावा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 काटेवाडी : प्रतिनिधी 
ढेकळवाडी (ता बारामती ) येथे उमेद अभियान, पंचायत समिती बारामती व ग्रामपंचायत ढेकळवाडी यांच्या वतीने आशा महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उद्‍घाटन व बचत गटातील महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आशा महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन पंचायत समितीचे सदस्य राहुल झारगड, संरपच लक्ष्मीबाई बोरकर, उपसरपंच राहूल कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
                   यावेळी ढेकळवाडी, खताळपट्टा ३५ फाटा परिसरातील महिला बचतगटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्यात बोलताना पंचायत समितीचे सदस्य राहूल झारगड म्हणाले की ग्रामीण भागातील महिलांनी केवळ चूल आणि मूल ही जुनी संकल्पना बाजूला ठेवून बचतगटाच्या माध्यमातून मोठी क्रांती केली आहे. उमेद अभियान, पं बचत गटाच्या माध्यमातून छोट्या व्यवसायापासून ते उद्योग निर्मिती पर्यंत महिलांनी झेप घेतली असून त्या आधिक आर्थिक सक्षम होण्यासाठी  सहकार्य करण्याची गरज असल्याचे झारगड यांनी सागितले महिलाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तालुक्यातील वितीय संस्थाचे ( बॅकाचे ) मार्गदर्शन पर शिबीराचे आयोजन ग्रामपंचायती च्या माध्यमातून करण्याच्या सूचना ही दिल्या. स्वागत संरपच लक्ष्मीबाई बाळासाहेब बोरकर यांनी केले तर प्रास्तविक व सुत्रसंचालन योगिता टकले, प्रिंयका देवकाते यांनी केले .
या वेळी पंचायत समितीचे तालुका अभियान व्यवस्थापक संदीप पालवे, विशाल इंगुले, उपसंरपच राहूल कोळेकर,सिमा ठोंबरे, सुभाष ठोंबरे, माजी संरपच बाळासाहेब बोरकर, अजित घूले,तंटामुक्ती चे अध्यक्ष शिवाजी लकडे, संजय टकले, संजय ठोंबरे, ग्रामसंघाच्या दिपाली देवकाते ,ज्योती खरात, विद्या ठोंबरे,उज्ज्वला जगताप, दिपाली ठोंबरे ,मोनाली जंगम, आदीसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व बचत गटांच्या दैनंदिन कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी सदाशिव संभाजी थोरात यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बचत गटातील महिलांसाठी विविध  उद्योग व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे व उपयुक्त माहिती दिली . प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्या डॉ ज्योती सांळूखे व आरोग्य सेविका रोहिणी म्हेत्रे, पुष्पा ठोंबरे यांनी महिलांच्या आरोग्य विषयी व आरोग्य केंद्रांतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
 
To Top