सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
वरंधा ता.भोर घाटात हिर्डोशी येथे महाड वरून भोरकडे येत असताना वळणाचा अंदाज न आल्याने फेरीवाला दुचाकीस्वार ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवार दि.२१ घडली.मात्र त्वरित याच मार्गावरून प्रवास करणारे नेरे ता.भोर येथील सद्या मोहोत ता.महाड येथे कार्यरत असलेले शिक्षक विजय बदक व त्यांचे सहकारी संदीप मोरे यांच्या लक्षात आल्याने प्रसंगआवधान राखून दरीत पडलेल्या फेरीवाल्यास दरीतून वर काढून भोर येथे स्वतःच्या चार चाकी गाडीतून आणून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
खुर्च्या विकणारा फेरीवाला रवीपिता शर्मा वय -२३ पाटण, चिपळूण, पाचवड वरंधा घाट मार्गे महाडला जात असताना हिर्डोशी जवळील पुलावरून खोल दरीत कोसळला होता.त्याच्या मणक्याला छातीला जोरदार मार लागल्याने फेरीवाल्यास दरीतून वर येता येत नव्हते. मात्र बदक यांनी या फेरीवाल्यास मदत करून भोर येथील रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले. फेरीवाल्याबरोबर अजूनही तीन ते चार फेरीवाले होते.अपघातग्रस्तास मदत केल्याने राजस्थान येथील फेरीवाल्यांकडून मदत करणारे शिक्षक विजय बदक यांचे अभिनंदन केले गेले.