शिरोळ ! शालेय मुलांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे : डॉ. अरविंद माने

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ प्रतिनिधी 
मुलांनी टीव्ही इंटरनेट व मोबाईल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपले शरीर मन आणि मनगट मजबूत होण्याकरिता मैदानी खेळांना प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी केले
         येथील संगमनगरमधील मुलांनी कबड्डीचे मैदान तयार करून त्या ठिकाणी कबड्डी खेळण्यास सुरुवात केली आहे या मैदानी खेळात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता नगरसेवक डॉ अरविंद माने व माजी सरपंच गजानन संकपाळ यांनी आपल्या स्वखर्चातून खेळाडूंसाठी स्पोर्ट्स किट दिले आहेत या किटचे वाटप प्रसंगी नगरसेवक डॉ अरविंद माने बोलत होते या समारंभाचे अध्यक्षस्थानी गजानन संकपाळ हे होते यावेळी दोघांनीही कबड्डी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी या खेळात यश मिळवावे तसेच विविध ठिकाणी कबड्डी स्पर्धेला जाताना येणारा प्रवास खर्च आपण स्वतः देऊ असे आश्वासन दिले
         यावेळी दादासाहेब आवळे अमित भोरे सुभाष पाटोळे योगेश आवळे पोपट बिराणे सोनू भोरे बबन सदामते रोहित आवळे प्रसाद आवळे नितीन आवळे सुनील आवळे अक्षय आवळे यांच्यासह संगमनगरमधील नागरिक व कबड्डी खेळणारे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते
To Top