सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : सचीन पवार
बारामती तालुक्यातील अनेक वर्षापासुन बेफीकीरपणे निडावरलेल्या मोरगाव -आंबी कऱ्हा नदी पात्रात होणाऱ्या बेसुमार वाळू माफीयावर रविवारी पाहेटेच्या सुमारास पुणे स्थानिक गुन्हे अन्वेशन ग्रामीण शाखा व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई करण्यात आली आहे ,
यावेळी मिळालेल्या फिर्यादीनुसार मनोहर शामराव चांदगुडे वय 46 वर्षे रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती जि.पुणे 2) स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे वय 27 वर्षे रा.आंबी खु।। ता.बारामती जि.पुणे 3) विठठल तानाजी जाधव वय 25वर्षे रा.आंबी खु।। ता.बारामती जि.पुणे 4) अमोल शंकर सणस वय 46 वर्षे रा. उरूळीकांचन ता.हवेली जि.पुणे 5) महादेव बाळु ढोले वय 38 वर्षे रा. मोरगाव चैयथाळवस्ती ता.बारामती जि.पुणे 6) विकास बाबासो चांदगुडे 35 वर्षे रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती जि.पुणे अशी याकारवाईत सापडलेल्या इसमांचे नामे असुन अजुन तिन अनोळखी इसम याठिकाणी छापा पडताच ठिकाणावरुन पोबारा करून गेले आहेत,
तसेच रविवारी रात्री 03/35 वा.चे सुमारास मौजे चांदगुडेवाडी ता.बारामती जि.पुणे गावचे हददीत धरणवस्ती येथे क-हा नदीपात्रात हे सर्व इसम बेफीकीरपणे वाळू उत्खन्न करून वाहने भरत असल्याचे निर्दशनास आले असुन यावेळी खालील प्रमाणे वाहने हस्तगत करण्यात आली असुन यामध्ये एक पिवळे रंगाचे जेसीबी कंपनीचे थ्रीडीएक्स मॉडेलचा मशीन नं. एम.एच.42 ए.9283,हिरवे रंगाचा जॉनडिअर कंपनीचा टॅक्टर नं. एम.एच.42 वाय बरोबर 7801 जोडलेली लाल रंगाची डंपीग ट्रॉली नंबर नसेलेली त्यामध्ये 1ब्रास वाळु भरलेली,तसेच निळे रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम.एच.42 एफ ,त्यास 3942 निळे रंगाची डंपींग ट्रॉली मोकळी नंबर नसलेली ,लाल रंगाचा महींन्द्रा कंपनीचा टॅक्टर नं. एम.एच 13 जे,त्यास 8096 लाल रंगाची डंपीग ट्रॉली मोकळी नंबर नसलेली तसेच हिरवे रंगाचा जॉनडिअर कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम.42जे.एस.4762, त्यास लाल रंगाची डंपीग ट्रॉली त्यामध्ये 1ब्रास वाळु भरलेली, एक पिवळे रंगाचे जेसीबी मशीन थ्रीडीएक्स मॉडेलचे जेसीबी मशीन नं एम.एच.09सी.एल 211तसेच लाल रंगाचा टाटा कंपनीचा 1613 मॉडेलचा ओपन बॉडी ट्रक नं. एम.एच.12एच.डी.7811त्यामध्ये 5ब्रास वाळु असे सर्व 47,70,000/- एकुण रू.येणे प्रमाणे वरील वर्णनाचे जेसीबी मशीन, ट्रक व टॅक्टर डंपीग ट्रॉलीसह पोसई शेलार सो,यांनी दोन पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेवुन गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आलेले आहे छापा टाकला ती वेळी 03/35 वा.ची होती हकीगत- वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी मौजे चांदगुडेवाडी ता.बारामती जि.पुणे गावचे हददीत धरणवस्ती येथे क-हा नदीपात्रात इसम नामे 1) मनोहर शामराव चांदगुडे वय 46 वर्षे रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती जि.पुणे 2) स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे वय 27 वर्षे रा.आंबी खु।। ता.बारामती जि.पुणे 3) विठठल तानाजी जाधव वय 25वर्षे रा.आंबी खु।। ता.बारामती जि.पुणे 4) अमोल शंकर सणस वय 46 वर्षे रा. उरूळीकांचन ता.हवेली जि.पुणे 5) महादेव बाळु ढोले वय 38 वर्षे रा. मोरगाव चैयथाळवस्ती ता.बारामती जि.पुणे 6) विकास बाबासो चांदगुडे 35 वर्षे रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती जि.पुणे तसेच लाल रंगाचे चारचाकी वाहन क्र. एम.एच.42बी.जे. 0034 या मधील अनोळखी तिन इसम असे जेसीबी मशीन ट्रक व टॅक्टर डंपींग ट्रॉलीसह बेकायदा बिगरपरवाना क-हा नदीपात्रात चोरून वाळु उत्खनन करून चोरी करून घेवुन जात असताना मिळुन आले. इसम नं 1 ते 6 व अनोळखी तिन इसम यांचे विरूध्द सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे. मजकुरची फिर्याद सुपा ओ पी खबर न 32/2023 वरून गुन्हा रजि.दाखल करण्यात आला असुन गुन्हाचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना केला असून पुढील तपास पोसई शेलार हे करीत आहेत,