खंडाळा ! लोणंद पोलिसांची तत्परता....वाईच्या महिलेची सात तोळे सोन्यासह हरवलेली पर्स मिळवून दिली परत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रशांत ढावरे 
लोणंद ता. खंडाळा येथे एसटी स्टँड काल दि २९ रोजी आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वर्षा शामराव महानवर वय ३६ राहणार लगडवाडी तालुका वाई जिल्हा सातारा ह्या त्यांचा मुलगा तेजस शामराव महानवर याचे सोबत आली असता तिची पर्स एसटी स्टँड येथून गहाळ झाल्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनला फोन आले. 
         नंतर सदर घटनास्थळी लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने पोलीस नाईक सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, अभिजीत घनवट, अवधूत धुमाळ ,महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती मदने यांनी एसटी स्टँड येथे भेट देऊन आजूबाजूला शोधाशोध केली  असता सदर महिलेची पर्स एसटी स्टँड लगत असले भिंतीकडेला मिळून आली त्या पर्समध्ये तिचे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले त्याबाबत त्या महिलेला तिचे दागिने पोलीस स्टेशनला आणून परत केले तिने त्याबद्दल लोनंद पोलीस स्टेशनचे आभार मानले या घटनेनंतर लोनंद पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक होत आहे.
To Top