सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोरच्या ग्रामीण भागातील वैभव सुरेश कदम यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षत चार्टर्ड अकाउंटंट (सी ए) म्हणून घवघवीत यश मिळविले.
वैभव कदम याने ग्रामीण भागात शिक्षण घेत तयारी करून यश मिळवले असल्याने त्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे.त्याच्या यशामध्ये त्याचे आई-वडील ,बहीण यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून स्वतंत्र प्रॅक्टिस करून व्यवसाय करणार असल्याचे वैभवनी सांगितले. वैभवच्या यशाबद्दल शिक्षक नेते सुदाम ओंबळे, पंडित गोळे, संजय पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या .