शिरोळ ! प्रा. रमाकांत साठे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : प्रतिनिधी 
कुरुंदवाड येथील सहकार भूषण एस के पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रा रमाकांत साठे यांना कोल्हापूर जिल्हा इंग्लिश शिक्षक संघटना,  यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी, प्रा. रमाकांत साठे यांचा सत्कार केला
प्राध्यापक रमाकांत साठे यांनी कठोर परिश्रम करत गेले २५ वर्षे प्रामाणिकपणे इंग्लिश विषयास प्राधान्य देत कनिष्ठ  महाविद्यालयातील तसेच समाजातील गरीब व होतकरू मुलांना चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिक्षण दिले तसेच इंग्लिश भाषेबद्दल विद्यार्थ्यामध्ये जागृती निर्माण केली इंग्लिश बोलणे व शिकल्यामुळे आपली तसेच आपल्या कुटुंबाची तसेच समाजाची कशी प्रगती होते या प्रकारची माहिती देत उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी शिक्षण के क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले कोल्हापूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार प्रा जयंत असगावकर यांच्या हस्ते प्रा साठे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी. संघटनेचे सचिव प्रा अविनाश  तळेकर, प्रा. दुगीॅ, प्रा. संजय मोरे, प्रा. पोर्लेकर, प्रा. डोणे  यांच्यासह कोल्हापूर जिल्हा इंग्लिश शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
प्र रमाकांत साठे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी सत्कार केला यावेळी शाहू वाचनालयाचे उपाध्यक्ष एम एस माने विनोद मुळीक आमगोंडा पाटील किरण गायकवाड दीपक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
To Top