बारामतीत नुसता पुलांचाच विकास...! रस्ते मात्र भकास....! चांगले पूल पाडून..नवीन पूल बांधण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा हट्टाहास कोणासाठी?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्यासह बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांची कामे सुरु आहेत. गरजेपेक्षा अवाढव्य उंचीचे तसेच अवाढव्य खर्चाचे पूल बांधण्याचा हट्टाहास सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे.
मंग बारामतीतील विकास कामे नक्की कोणासाठी ? नागरिकांसाठी का अधिकारी, ठेकेदार यांच्या कमिशनसाठी....असा सवाल सर्वसामान्य लोकांना पडला आहे. चांगले पुल पाडून नवीन पुल बांधण्याचा लावला आहे सपाटाच बांधकाम विभागाने लावला आहे.
         शेंडकरवाडी येथील पुलाची उंची कालवा भरवापासून तब्बल सात फूट उंच केली असतानाच ..आता बांधकाम विभागाचा अजून एक प्रताप पुढे आला आला. होळ (ता. बारामती) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुस्थितीतील पुलाचे काम करण्याचा घाट घालण्यात आला असून याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जवळच असलेल्या लिंबरकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून तो रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून सुस्थितीतील पुल पाडून ठेकेदार व अधिकारीयांच्या फायद्यासाठी या पुलाचे काम करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा होळ परीसरात आहे. चार ते पाच वर्षांपूर्वीच या पुलाचे काम झाले आहे. पुल सुस्थितीत असून यावरून वाहतूक सुरू आहे. शिवाय पावसाळ्यात या पुलावरून पाणीही जात नाही तरीही हा पुल पाडून नव्याने पुल का बांधला जातोय ते न समजणारे कोडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कोणाच्या सांगण्यावरून या पुलाचे काम करत आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
           बारामतीच्या पश्चिम भागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्ते दुरुस्त करून वाहनचालकांना दिलासा देण्याची गरज असताना रस्ते दुरुस्त करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सध्या सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. बैलगाडी आणि ट्रॅक्टरला ऊसाची वाहतूक करताना मोठी अडचण येते याशिवाय वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना रस्त्यावरील खड्यांमुळे घरीही व्यवस्थित जाता येत नाही त्यामुळे रस्ते दुरुस्त करून मगच पुलांची कामे करणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी विकासकामांची खरोखरच गरज आहे त्याठिकाणी निधी टाकणे गरजेचे आहे विनाकारण निधीचा अपव्यय होवू नये एवढीच ग्रामस्थांची मागणी आहे.
................
To Top