गुणवडीच्या युद्धात धारातीर्थी पडले....! तरीदेखील अवघे अकराशे सैन्य घेऊन अल्लाउद्दीन खिलजीच्या दहा हजार सैन्यांना नडले....! करणसिंह गावडे यांच्या स्मृतींना उजाळा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
अल्लाऊद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याच्या दहा हजार सैन्याशी वीर करणसिंह गावडे यांनी अकराशे सगर आणि काही ब्राम्हण योद्धे बरोबर घेऊन गुणवडीजवळ घनघोर युद्ध केले होते. या युद्धात २० जानेवारी १३११ ला करणसिंह गावडे धारातिर्थी पडले. परंतु त्या आधी त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला. त्यांच्या पराक्रमाची नोंद तत्कालीन अनेक इतिहासकारांनी घेतली होती. त्यांच्या पराक्रमावर अनेक युद्धगीते आणि दोहे रचले गेले होते तर काही लोककलाकार उत्तर भारतात यावर गावोगावी नाटिका सादर करायचे. 'हिंदुस्थान का बलदंड योध्दा' असे विशेषण करणसिंह गावडेंबद्दल इतिहासकारांनी त्यांना दिले होते.  
त्यांचा स्मृतिदिन 'क्षत्रिय सगर राजपूत (सगर मराठा) सेवा संघ' ही संघटना दरवर्षी 'शौर्यदिन' म्हणून साजरा करते आणि त्यांना अभिवादन करते.
यावर्षी गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी संघटनेने मेडद ते मळद-गुणवडी अशी दुचाकी व चारचाकींची भव्य रॅली आयोजित केली होती. दत्तोबा मंदिर, गुणवडी येथे ही रॅली पोहोचल्यावर वीर करणसिंह गावडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आरी आणि त्यानंतर महाराष्ट्रातील नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले गेले.
ही माहिती संघटनेचे मुख्य संयोजक बबलू गाढवे, बारामती तालुका अध्यक्ष महेश मोहन गावडे व उपाध्यक्ष  ऋषिकेश गावडे यांनी दिली.
To Top