अभिमानास्पद ! निंबुतच्या 'अक्षय'ची गगनभरारी...! दिल्लीतील परेडमध्ये केले सुखोईचे सारथ्य

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
निंबूत ता. बारामती येथील स्क्वाड्रन लीडर अक्षय प्रमोद काकडे याने प्रजासत्ताकदिनाच्या दिल्ली येथील परेड दरम्यान वायुदलाच्या सुखोई एमके आय 30 या विमानाचे सारथ्य करत कर्तव्य पथावरून उत्थंग भरारी घेतली. 
           तीन सुखोई विमाना पैकी एका विमानाचे सारथ्य बारामतीचे २७ वर्षीय स्क्वाड्रन लीडर अक्षय प्रमोद काकडे यांनी केली. ग्रुप कॅप्टन ए धनकर व विंग कमांडर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अक्षय काकडे यांनी ही सलामी दिली. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी भारतीय वायुदलाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन देशवासीयांना घडवले जाते बारामतीकरांनी सर्वच क्षेत्रात आपला नावलौकिक प्रस्थापित केलेला आहे अक्षय काकडे हे मुळचे बारामती तालुक्यातील निंबुत गावचे असून एक शेतकरी कुटुंबातील आहेत. निंबूत येतील शरद पवारांचे विश्वासू सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गणपत काकडे यांचा अक्षय हा नातू आहेत. अक्षयच्या इतक्या लहान वयात लढाऊ विमान उडवण्याची संधी मिळाली ही बाब निंबूतकरांच्या व त्याचे वडील उद्योजक प्रमोद काकडे व आई संगीत काकडे यांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे अक्षय वर बारामती तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
To Top