सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा - ओंकार साखरे
कारागीरांची आर्थिक जिवनदायिनी असलेल्या जावली तालुका ग्रामिण औद्योगिक विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होताना विरोधी उमेदवारांनी संस्था वाचविण्यासाठी मोलाचे सहकार्य करीत स्वतःचे उमेदवारी अर्ज माघार घेवुन बलीदान दिल्याने संस्था बिनविरोध करण्यात यश आले आहे.
जावलीतील ग्रामोद्योग संस्थेच्या पंचवार्षीक निवडणूकी मध्ये ११ जागांसाठी २३ जनांचे अर्ज दाखल झाले होतो. छाननी प्रक्रियेत एक ही अर्ज अपात्र झाला नसल्यामुळे निवडणूक अटळ समजली जात होती. जसे समजेल तसे अर्ज भरले गेल्यामुळे बिनविरोध करण्यात अनेक अडचणी येत होत्या.
आज ( दि.२७ ) अखेरचा दिवस असताना आणि एकही अर्ज माघार नसताना संस्थेचे माजी चेअरमन संजय जनघरे व बाजार समितीचे संचालक शिवाजी गोरे यांनी अखेरच्या क्षणी जादुई कांडी फिरवत संपूर्ण संस्था बिनविरोध करण्यात यश मिळविले.
संस्थेच्या हितासाठी शिवाजी गोरे, जगन्नाथ चिकणे, संतोष करंजेकर, सुभाष चिकणे, विजय सपकाळ, संजय जुनघरे, अशोक गोळे, सौ. आशा शिंदे, विठ्ठल कोकरे, सौ. सुशिला भोसले यांनी अर्ज माघार घेवुन संस्था बिनविरोध होण्यासाठी योगदान दिले.
तालुक्यातील सर्वांच्या नजरा या निवडणूकीकडे लागल्या असताना शेवटच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतल्याने सोमनाथ साखरे, संतोष कासुर्डे, राजेंद्र गोळे, रघुनाथ जवळ, मधुकर पवार, विजय खरात, सौ. पुष्पा चिकणे, कल्पना कदम, नितीन सोनटक्के, संजय कांबळे आणि चित्तरंजन गोरे यांचे अर्ज शिल्लक राहील्याने संस्था बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश देशमुख यांनी ११ जागांसाठी ११ अर्ज शिल्लक राहीले असल्याचे सांगीतले.
COMMENTS