बारामती ! सुपे परगण्यातील वाहनधारकांची मागणी पूर्ण : कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारला तालुक्यातील दुसरा सीएनजी पंप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : सचिन पवार 
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित सुपे येथील सी.एन.जी पंपाचे उद्‌घाटन 26 जानेवारी 2023 प्राजासस्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले,
       यावेळी बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांच्या हस्ते या पंप च्या वितरणास सुरूवात करण्यात आली असुन बाजार समितीच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेला हा तालुक्यातील बारामती नंतर हा पहिला सी.एन.जी. पंप असून, या पंपामुळे परिसरातील लोकांची मोठी सोय होणार आहे. अष्टविनायक मोरग्राव -सुपे -सिद्धटेक मार्गावर व शिरूर सातारा या दोन्ही मार्गाना जोडणाऱ्या नॅशनल हाईवे 965D या मार्गावर हा पंप असुन या मार्गावर घरगुती व अवजड वाहनांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे ,
         या कार्यक्रमास सचिव अरविंद जगताप, संदीप जमदाडे ,सह ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते , सी.एन.जी. पंपासाठी प्रशासक मिलिंद टांगसळे यांनी महत्वपुर्ण पाठपुरवा केला , 
To Top