सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील सामाजिक , शैक्षणिक , आरोग्यसेवा व गड संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श कार्य केल्याबद्दल आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर यांना वेल्हे तालुक्यातील मावळा जवान संघटनेच्या वतीने राष्ट्रीय मावळा भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात हिंदवी स्वराज्याची पहीली राजधानी राजगड किल्ला पायथ्याशी असलेल्या पाल बुद्रुक ता.वेल्हा मावळा तीर्थ ऐतिहासिक परिसरात घोडेकर यांना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्तात्रय नलावडे , हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील , सरदार यशाची कंक यांचे वंशज संजय कंक , सरदार प्रतापराव गुजर यांचे वंशज ऋषिकेश गुजर यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित केले गेले.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त रमेश शेलार,वेल्हा तहसीलदार शिवाजी शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार , शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर ,सरपंच नीता खाटपे मावळा जवान संघटनेचे कार्यवाहक रोहित नलावडे , शिवाचार्य सुनील जंगम , निलेश पांगारकर,प्रशांत शेटे,विलास मादगुडे,उमेश आहिरे,महेंद्र देवघरे संदीप खाटपे व शिवप्रेमी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.