सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा - प्रतिनिधी
जावली तालुक्याच्या पर्याटक स्थळासह विविध ठिकाणी फेसबुक द्वारे ओळख झालेल्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करून त्या मुलीवर बलत्कार करून ती गरोदर राहील्याने तिचा गर्भपात करणाऱ्या संशयित आरोपी कृष्णकांत इंदलकर याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस ठाण्यातुन देण्यात आली.
याबाबत दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी कृष्णकांत सूर्यकांत इंदलकर, रा. 393 करंजे बेट जुना हायवे पाराजवळ ता. जि. सातारा याने एका मुलीची ओळख फेसबुक द्वारे करून घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून बामणोली, यवतेश्वर , लाटघर बीच दापोली, मुरुड बीच दापोली, गुहागर, ता. चिपळूण या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊन वेळोवेळी त्या मुलीशी जबरदस्तीने इच्छेविरुद्ध शरीर संबंध केले आहेत. संबधीत मुलगी काही महिन्यांची गरोदर राहिल्याचे लक्षात आल्याने सातारा येथिल एका दवाखान्यात नेऊन तिचा गर्भपात करण्यास आला असल्याचे त्या मुलीने आपल्या फिर्यादित म्हटले आहे.
या घटणेबाबत फिर्यादिने दिलेल्या माहितीनुसार कृष्णकांत सूर्यकांत इंदलकर याच्यावर भा.दं.वि.सं.क.313,376,376(2),(N) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख यांच्या मार्गदशानाखाली सपोनि एस. व्ही. तासगांवकर करीत आहेत.