गिरणारी चारिटेबल ट्रस्ट वडजलवाडी मोरवे यांच्याकडून साई सेवा पालखीला मोफत वैद्यकीय सेवा

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
साई पालखी सोहळा गोवा ते शिर्डी पायी पालखी सोहळा यांचे आगमन दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी निर्गुण  पादुका मंदिर मळद येथे आगमन झाले. 
            या ठिकाणी पाली पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामपंचायत मळद यांचे तर्फे करण्यात आले. तीर्थक्षेत्रावर भक्तांचे महाप्रसादाची व मुक्कामाची सोय ग्रामस्थांतर्फे करण्यात आली , त्याचप्रमाणे पायी चालणाऱ्या भक्तांसाठी गिरणारी चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट वडजलवाडी यांनी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. ट्रस्टतर्फे डॉक्टर प्रशांत जावळे परक शेठ गुजर धीरज वायसे व हिम्मत पडळकर यांनी पायी चालणाऱ्या भक्तांना वैद्यकीय सेवा दिली , यावेळी भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये डॉक्टर प्रशांत जावळे यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय निरा येथे झालेले आहे. हे ट्रस्ट आषाढी वारीमध्ये माऊलींच्या पालखीसोबत चालणाऱ्या भक्तांना सुद्धा वैद्यकीय सेवा देते. मळद ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी गिरणारी चारिटेबल ट्रस्ट यांचे आभार मानले.
To Top