सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे येथील पळसोशी -नेरे ओढ्यावरील बुरंब्याच्या बंधाऱ्याला मागील एक महिन्यापासून मोठी गळती सुरू असून बंधाऱ्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना पाणी कमी पडत असून याकडे छोटे पाटबंधारे विभाग पंचायत समिती भोर यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
पळसोशी-नेरे ता.भोर ओढ्यावरील बुरंब्याच्या बंधाऱ्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली येत असते.मात्र बंधाऱ्यातून दररोज वाया जाणाऱ्या पाण्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना पिकांना पाण्याचा तुटवडा भासत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले संबंधित विभागाने लवकरात लवकर या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
लवकरच बांधायची दुरुस्ती करणार
पळसूशी-नेरे ओढ्यावरील बुरंब्याच्या बंधाऱ्याची पाहणी करून जिल्हा परिषद छोटे पाटबंधारे विभागाला कळवून या बंधाऱ्याची दुरुस्ती लवकच केली जाईल असे छोपावी अधिकारी श्रीधर फणसे यांनी सांगितले.