सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका वकील संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड.मयूर जयसिंग धुमाळ तर उपाध्यक्षपदी ॲड. बाळासाहेब गोगावले यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी ॲड. धुमाळ तर उपाध्यक्ष पदासाठी ॲड.गोगावले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. पृथ्वीराज चव्हाण ,सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲड.चिव्हे यांनी पाहिले.यावेळी सचिव ॲड. राकेश कोंडे ,लेखापरीक्षक ॲड. रमेश धाडवे ,खजिनदार ॲड.अश्विनी टोले-कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.यावेळी जेष्ठ विधीज्ञ ॲड. टी.आर.देशमुख, ॲड. माणिकराव जायगुडे, ॲड.विजय मुकादम, ॲड.के.के.बांदल, ॲड.सोपान कोंढाळकर, ॲड. शिवाजी मरळ ,ॲड.मुकुंद तांबेकर,ॲड.राजेंद्र खोपडे, ॲड. विठ्ठल दुधाने ,ॲड. विश्वनाथ रोमन, ॲड. दत्तात्रय उरणकर, ॲड. दीपक बोरकर,ॲड.सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.