सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे ता.भोर खोऱ्यातील धोंडेवाडी-चिखलगावच्या जनतेचा विकास हाच ध्यास मनी धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बहुतांशी विकास कामे सुरू आहेत.पुढील काळातील उर्वरित कामांसाठी काय कटीबद्ध राहणार असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपाध्यक्ष
रणजीत शिवतरे यांच्या विशेष प्रयत्नातून धोंडेवाडी चिखलगाव येथील २ कोटी २५ लक्ष विविध विकास कामांचे उद्घाटन,वचनपूर्ती कार्यक्रमप्रसंगी शिवतरे बुधवार दि.१८ बोलत होते.जलजीवन पाणी पुरवठा योजना -रू ३८ लक्ष,गावठाण ते धोंडेवाडी रस्त्यावरील मुख्य रस्त्यावर पूल बांधणे - रु ३५ लक्ष, स्मशानभुमी शेड - ५.६० लक्ष,,धोंडवाडी अंतर्गत मेन रस्ता काॕक्रीटीकरण करणे-रू ५५ लक्ष, अंतर्गत रस्ता करणे -रू २० लक्ष
,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रु ३१ लक्ष,
धोंडेवाडी अंतर्गत बंदीस्त गटार करणे- रु ९ लक्ष,
,धोंडेवाडी अंगणवाडी बांधकाम करणे- रु ७ लक्ष
,धोंडेवाडी अंतर्गत रस्ता ओढ्यावर साकव बांधणे- रु २५ लक्ष,धोंडेवाडी अंतर्गत रस्ता करणे- रु २५ लक्ष,
चिखलगाव गावठाण, धोंडेवाडी, अडाचीवाडी सुधारित पुरक जलजीवन योजना- रु १५८ लक्ष असे एकूण २ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,खजिनदार पुणे शहर रा.कॉ.राजू गिरे ,बबन साळेकर,सरपंच छगन कांबळे,चिखलगाव सरपंच सुरेशबापू धोंडे,सिमा शिरगांवकर,मा.सरपंच मारुतीराव धोंडे,संपतराव धोंडे, रामचंद्र धोंडे,भाऊ धोंडे,नारायण धोंडे,किसन धोंडे, गोपाळ धोंडे,विठ्ठलबुवा धोंडे,सोपान धोंडे,सोपान धनावडे,बाजीराव धोंडे, अनिल धोंडे,नितीन धोंडे,अर्जुन दिघे, मिलिंद शिरगांवकर,अंकुश भिलारे,रघुआप्पा धोंडे,अमोल भिलारे,संकेत धनावडे, सुनील बापू धोंडे ,मुंबई पोलिसज्ञानेश्वर धोंडे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.