मेढ्याच्या विद्यार्थिनींनी मिळवले शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Admin
2 minute read
मेढा : ओंकार साखरे
गुरुकुल कॉम्प्युटर क्लासेस मेढा संचलित गुरुकुल कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी २०२२ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
            जावली तालुक्यातील मेढा गावातील विद्यार्थिनी कु.क्षितिजा अंकुश गोळे या विद्यार्थिनीने 252 गुण प्राप्त करीत जावली तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. मनीषा अशोक साह या विद्यार्थिनीने 250 गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
         गुरुकुल कोचिंग क्लासेस च्या मार्गदर्शक शिक्षिका सौ.रोहिणी अमोल चव्हाण यांनी केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे दोन्ही विद्यार्थिनींनी हे उज्वल यश संपादन केले आहे. या यशामुळे जावली तालुक्यातील सर्व स्तरावरून या विद्यार्थिनींवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
To Top