भोर ! शहराचे ऐतिहासिक गतवैभव टिकवून ठेवणार : आमदार संग्राम थोपटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 भोर शहरात पर्यटनाच्या दृष्टीने विकास कामे युद्ध पातळीवर सुरू असून शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार आहे.तर सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून शहराचे ऐतिहासिक गतवैभव टिकवून ठेवणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
      भोर शहरातील शनि घाटावरील जानूबाईमंदिर ते फडणवीस घाट सुशोभीकरणाच्या ५ कोटी ८३ लक्ष रुपयांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार थोपटे शुक्रवार दि.६ बोलत होते.यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे ,नगराध्यक्ष निर्मला आवारे,तहसीलदार सचिन पाटील,मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष समीर सागळे,महिला तालुकाध्यक्ष गीतांजली शेटे,नंदा जाधव तालुकाध्यक्ष गजानन दानवले,चंद्रकांत सागळे, गटनेते सचिन हरणस्कर, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, सुमंत शेटे, गणेश पवार ,अमित सागळे,नगरसेवक तृप्ती किरवे,आशा रोमन,अमृता बहिरट,सोनम मोहिते,देविदास गायकवाड,आशा शिंदे, इंजिनीयर अभिजीत सोनावले आदींसह नगरसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           आमदार थोपटे पुढे म्हणाले भोर शहरातील नागरिक वर्षानुवर्ष राजकारण बाजूला ठेवून विकास कामांसाठी एकत्रित येत असतात.त्यामुळेच भोर शहराचा विकास होत आहे तर मी बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून विकास कामे जोमाने करीत असतो.
To Top