पुरंदर ब्रेकींग ! सभासदावर १०१ केले म्हणून राख वि. का. सोसायटीच्या सचीवाला घरी जाऊन मारहाण : भोर सचिव संघटनेकडून जाहीर निषेध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
थकबाकी दार सभासदावर  १०१ दाखल केल्याप्रकरणी राख ( ता. पुरंधर ) येथील विकास संस्थेच्या सचिवाला मारहाण व शिवीगाळ केली. यांचा  भोर तालुका सचिव संघटनेने जाहिर निषेध नोंदवून भोरचे सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांना निवेदन दिले.  
      पुरंधर तालुक्यातील राख वि. का सेवा सह सोसायटीचे सचिव  श्रीकृष्ण संपतराव पवार यांनी संस्थेच्या कर्ज वसूलीसाठी   १०१ (१) कार्यवाही पूर्वी कर्ज मागणी नोटीस दिलेच्या रागातून त्यांच्या  घरी जाऊन मारहाण  व शिवीगाळ केली असून ही बाब अतिशय निषेधार्य आहे. तरी या बाबीचा भोर तालुका सर्व सचिव संघटनेमार्फत निषेध नोंदवीत आहे. तरी मारहाण  करणाऱ्या व्यक्ती जास्तीतजास्त  सजा मिळावी .  त्याच अशा घटनेची जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर घटना घडू नाही याची दक्षता घेण्यात यावी .  जेणे करुन सचिवाल संस्थेच्या  हिताचे घटनात्मक व नियमानुसार कामकाज करणे सुलभ होईल व सचिव विना भितीने नियमा नुसार कामकाज करेल.त्याच प्रमाणे भोर येथील आपटी वि का. सेवा सह. सोसा. चे सचिव  विठ्ठल गोपाळ पारठे यांना सुधा तेथील शेतकरी फोन वरुण  धमकी वजा संभाषण करीत आहे. याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध नोंदवत आहे.
      यासंबधी आमदार संग्राम थोपटे , तज्ञ संचालक भालचंद्र जगताप , तहसिलदार सचिन पाटील , पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना ही निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव संघटना प्रतिनिधी संदिप चक्के , तालुका अध्यक्ष रमेश जेधे , सुनिल गायकवाड , भरत शिंदे , महेंद्र तावरे , विठ्ठल पारठे , विजय किंद्रे , मनोहर भिलारे , आनंदा शेलार , संतोष उत्तेकर , प्रकाश पाटणे , सुरेश वाघुलकर , मयुर जेधे  , सागर दुधाणे , पुरुषोत्तम बाठे , जितेंद्र नवघणे , उद् य जेधे , दशरथ पांगारे , मच्छिंद्रनाथ कुंभार , सौ. नेञांजली उल्हाकळर सर्व सचिव उपस्थित होते. 

To Top