पुरंदर ! कर्नलवाडी येथील प्रस्तावित खडी क्रशर विरोधात ग्रामस्थ एकवटले.... खडी क्रशर नकोच म्हणत....ग्रामस्थांची अजितदादांकडे धाव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील होणाऱ्या प्रस्तावित खडी क्रशर विरोधात ग्रामस्थ एकवटले असून खडी क्रशर नकोत म्हणत याबाबत सव्वाशे ग्रामस्थांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना सह्यांचे निवेदन दिले आहे. 
           ग्रामस्थांची अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुळुंचे कर्नलवाडी, सुकलवाडी येथील शेतकरी, मेंढपाळ विनंतीपूर्वक निवेदन देतो कि, गुळुंचे गावाचे पश्चिमेला बोलाई डोंगर आहे. त्या डोंगरमाथ्यावर पांडवकालीन गुहा आहे. त्या गुहेमध्ये बोलाई देवीचे प्राचीन काळातील मंदिर आहे. त्या देविचे दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. त्या डोंगराचे पायथ्याला गुळुंचे, सुकलवाडी येथील शेतकरी व कर्नलवाडी येथील मेंढपाळांच्या शेतजमिनी आहेत.
          त्या जमिनी काही दिवसापूर्वी जिरायत व चराऊ जमिनी होत्या त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी ५ ते ६ किलोमीटर वरून पाणीपुरवठा कार्यान्वित करून सदर शेती बागायत केल्या आहेत त्यामध्ये फळबाग, ज्वारी, बाजरी, उस अशी पिके घेतली जातात.
        कर्नलवाडी येथील मेंढपाळांनी बोलाई देविचे डोंगराच्या पायथ्याच्या काही जमिनी शैलेश रासकर रा. निंबूत यांना शेतीचाच व्यवसाय करायचा या बोलीवर जमीन विकली जमीन विकून त्यांनी देखील ५ ते ६ किलोमीटर वरून पाणीपुरवठा आणून विकून उरलेल्या शेतजमिनी बागायत करून फळबागा, उस, कडधान्य अशी पिके घेत आहेत.
       परंतु शैलेश रासकर यांनी देलेला शब्द न पाळता खडी मशिन व्यवसाय करणेचे नियोजन केलेले आहे. त्यांना या व्यवसायाबाबत शेजारील थोपटेवाडी, पिंपरे, पिसुर्टि, गुळुंचे कर्नलवाडी या गावातील शेतकऱ्यांनी आपण खडी मशिन व्यवसाय ऐवजी दुसरा व्यवसाय करा परंतु तुम्ही खड़ी मशिन व्यवसाय कराल तर आमचे पिकांचे, फळबागांचे, इतर पिकांचे मेंढपाळांचे चाऱ्याचे, पोल्ट्री व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकरण होईल. त्यामुळे तेथील शेतकरी व मेंढपाळा यांना गरीबेचे जीवन जगावे लागेल. तरी आपणाला विनंती करतो कि  शैलेश रासकर यांना खडी मशिन ऐवजी शेती आगर इतर व्यवसाय करणे बाबत सूचना करावी असे निवेदनात म्हटले आहे.
To Top