सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने भोर नगरपरिषदे समोरील प्रांगणात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी विविध मागण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचे शहराध्यक्ष सतीश गजानन शिर्के यांनी सांगितले.
पाच टक्के अपंग निधीचा चालू वर्षीचा पुढील हप्ता देण्याबाबत, अपंगांच्या घरकुलाच्या समस्या सोडविण्याबाबत तसेच अपंगांच्या रोजगार संदर्भात जागेच्या संदर्भातील समस्या लवकरच सोडवाव्यात अशी मागणी नगरपरिषद प्रशासनाला केली असता या मागण्यांचा विचार केला गेला नसल्याने भोर शहर दिव्यांगांच्या हक्काचे हिताचे दृष्टीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडणार आहे.तर नगरपरिषद प्रशासन जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे शहराध्यक्ष शिर्के यांनी सांगितले.यावेळी उपाध्यक्ष सुनील पळशीकर, तालुका महिला अध्यक्ष संगीता बहिरट, महिला उपाध्यक्ष शहीद शेख ,सचिव अशोक मोरे ,कार्याध्यक्ष दिगंबर चुनाडी, अनिल साळुंखे, रियाजभाई शेख उपस्थित होते.
COMMENTS