भोर ! स्वामी समर्थ अध्यात्मिक सत्संग मेळाव्याचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 मानवी जात सुखी आणि समाधानी झाली पाहिजे या सर्वोच्च मूल्यांची जतन करणारे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रिंबकेश्वर व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे श्री स्वामी समर्थ केंद्र भोर महाड नाका येथे शनिवार दि. ७ जानेवारी भव्य अध्यात्मिक सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
             दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व अष्टसिद्धी महाशक्तीपिठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र व गुरुपिठाचे प्रशासकीय प्रमुख युवा संत चंद्रकांत ( दादा )मोरे हे सदर मेळाव्यात उपस्थितांशी अमृततुल्य हितगुज साधनार आहेत. यावेळी मानवी जीवनातील ज्वलंत समस्या यावरती प्रश्न उत्तरे ,सर्व जाती धर्मातील भाविकांसाठी मोफत विवाह नोंदणी ,पर्यावरण विभाग, बालसंस्कार ,दुर्गसंवर्धन ,कृषीशास्त्र, आरोग्यशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विभागाविषयी माहिती तसेच देवघर देव्हारा कसा असावा ,देवांची मांडणी कशी असावी याविषयी मोफत माहिती व डेमो सहित प्रदर्शन होणार आहे.

To Top