सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोमनाथ प्रताप सोनवणे यांची निवड झाली.
आज दुपारी मुरूम ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजयकुमार शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी मल्लिकार्जुन गावकरी स्वाभिमानी पॅनेलच्या वतीने सोमनाथ सोनवणे तर मल्लिकार्जुन गावकरी परिवर्तन पॅनेलच्या वतीने सुलभा सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी घेण्यात आलेला गुप्त मतदानात सोमनाथ सोनावणे यांना ८ तर सुलभा सोनवणे यांना ७ मते मिळाली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे मा अध्यक्ष राजवर्धन शिंदे, मा संचालक नामदेवराव शिंगटे, अजित जगताप, जालिंदर जगताप, निलेश शिंदे, फत्तेसिंह जगताप, माऊली कदम, डॉ राहुल शिंगटे, नंदकुमार सोनवणे, सुनील चव्हाण, सचिन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक निर्णय निरीक्षण गायकवाड व ग्रामसेवक बाणदार यांनी काम पाहिले.