बारामती ! मराठी भाषा सौंदर्य जपणे व संवर्धन ही काळाची गरज : प्रा. राणी शेंडकर : सोमेश्वर वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक व मुक्त द्वार ग्रंथालय दर्जा अ   (इतर ) अंतर्गत सोमेश्वर वाचनालय सोमेश्वर नगर यांच्यावतीने नुकतेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या अंतर्गत "मराठी भाषेचे महत्व"  या विषयावर प्रा राणी शेंडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
              यांवेळेस मराठी भाषा सौंदर्य जपणे व संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच सोमेश्वर वाचनालयाच्या  माध्यमातून सर्व वयोगटातील वाचक वर्गाचे ज्ञान वृद्धीगत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जात आहे असे प्रतिपादन प्रा. राणी शेंडकर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोमेश्वर रिपोर्टर च्या संपादिका भारती जगताप होत्या.  या व्याख्यानाबरोबरच ग्रंथालयाकडून पंचक्रोशीतील महिलांसाठी  "तिळगुळ आणि हळदी कुंकू कार्यक्रम" ही आयोजित करण्यात आला होता.
यासाठी पंचक्रोशीतील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. त्यांना ग्रंथालयाबद्दलची माहिती व आवड निर्माण व्हावी यासंदर्भातही कार्यक्रमादरम्यान चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक  कल्याण जगताप (अध्यक्ष सोमेश्वर वाचनालय),  सूत्रसंचालन प्रा. प्रियंका जगताप व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संजय जाधव  यांनी केले.
      कार्यक्रमाचे आयोजन हे ग्रंथपाल श्री देविदास काळखैरे  , सहा. ग्रंथपाल अजित जगताप , हरिश्चंद्र सावंत यांनी केले.
 या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.डॉ.अजय दरेकर,  श्री. अनिल भोसले, श्री उदयसिंह जगताप प्रा. रविंद्र होळकर , प्रा. कुटे मॅडम , अभ्यासिकेतील विद्यार्थी वर्ग ,ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.
To Top